कार्तिकी सदानंद सुर्वे प्रथम क्रमांक, वेदा विठ्ठल खोरजे द्वितीय क्रमांक, अवनी सुजित परब तृतीय क्रमांक
मालवण | प्रतिनिधी : लायन्स क्लब मालवणतर्फे मालवण येथील कन्याशाळेत ‘जागतिक शांतता’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये जागतिक शांततेचे महत्त्व, बंधुभाव, सहिष्णुता आणि सामाजिक सलोखा यांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत कार्तिकी सदानंद सुर्वे प्रथम क्रमांक, वेदा विठ्ठल खोरजे द्वितीय क्रमांक, अवनी सुजित परब तृतीय क्रमांक तसेच उत्तेजनार्थ दोन स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत शाळेतील ११ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
निबंधाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जागतिक शांततेविषयी आपले विचार मांडले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याला चालना मिळण्याबरोबरच सामाजिक आणि जागतिक प्रश्नांविषयी त्यांची जाणीव अधिक समृद्ध होण्यास मदत होते.
या वेळी प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद सौ. श्रद्धा गोसावी, सौ. शिवानी पाटकर, आकांक्षा कसले, प्रियांका वराडकर, प्रतीक्षा जाधव आदी उपस्थित होते.
तसेच लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, सेक्रेटरी पूनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर, गणेश प्रभुलकर, मुकेश बावकर, महेश अंधारी, रुजरीओ पिंटो, वैशाली शंकरदास आणि उमेश शिरोडकर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये शांतता, सहकार्य आणि वैश्विक बंधुभावाची मूल्ये रुजविण्यासाठी लायन्स क्लब मालवणतर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.













