वाढलेले तापमान आणि पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता दोन वर्ष वृक्षतोड बंद ठेवावी

वनविभागाने वृक्षतोडीबाबत कठोर पावले उचलण्याची मागणी वन्य प्रेमींची मागणी

लांजा (प्रतिनिधी) : गेल्या काही वर्षात तालुक्यात झालेली बेसुमार वृक्षतोड त्यातून बिघडलेला पर्यावरणाचा समतोल आणि निर्माण झालेली पाणीटंचाईची तीव्र समस्या लक्षात घेता पुढील किमान दोन वर्ष तरी वृक्षतोडीवर बंदी घालावी, अशी मागणी तालुक्यातील वन्यप्रेमीतून केली जात आहे.
लांजा तालुक्याचा विचार करता गेल्या काही वर्षात लांजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाले आहे. खाजगी क्षेत्रावरील जमिनी बरोबरच शासकीय जमिनीवरील वृक्षतोड ही सुरू आहे. उदाहरण द्यायचे झाले म्हटले तर तालुक्यातील लांजा साटवली, लांजा आसगे दाभोळे, लांजा कुरणे पूनस रत्नागिरी, लांजा जावडे या रस्त्या शेजारी असलेली अकेशिया व अन्य सर्व प्रकारच्या झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे.
खाजगी जमिनीवर असलेल्या वृक्षतोडीवर शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचा अधिक डोळा असून स्थानिकांसह परत जिल्ह्यातील लाकूड व्यापारी या ठिकाणी असलेल्या वृक्षांची तोड करत असल्याने एकेकाळी वृक्षराजीने हराभरा असलेला लांजा तालुका भकास होत चालला आहे. सरसकट जंगलतोडीमुळे डोंगर आणि जंगले उघडी बोडके झाले आहेत. सध्या निर्माण झालेल्या पाणीटंचाईला मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड हे एक महत्वाचे कारण आहे. वृक्षतोडीमुळे तापमानात प्रचंड वाढ झाली असून त्याचे चटके लोकांना सहन करावे लागत आहेत.
आणि म्हणूनच ही बाब लक्षात घेता पुढील दोन वर्षे वृक्षतोडीवर बंदी घालण्यात यावी. अशी मागणी वन्यप्रेमीतून केले जात आहे.