दोडामार्ग: सुहास देसाई

साटेली भेडशी येथील प. पू. महाराज स्मारक मंदिराचा दहावा वर्धापनदिन येत्या ३ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत तरी सर्व भक्तांनी उपस्थित राहावे आशिर्वाद घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मंगळवार दिनांक ०३ नोव्हेंबर २०२६
पहाटे ०५.३० वा ते ६.०० वा
काकड आरती नंतर
श्री. प. पु. स. समर्थ राऊळ महाराज चरणी अभिषेक, पाद्यपूजा व सार्वजनिक गा-हाणे श्री भवानी सातेरी धारेश्वर महिला भजन मंडळ घोडगे यांचे सुश्राव्य भजन
सकाळी १०.३० ते ११.३० वा. दुपारी १२.०० ते १२.३० वा. आरती
श्री सातेरी महिला भजन मंडळ खानयाळे यांचे सुश्राव्य भजन
दुपारी १२.३० ते १.००
सातेरी केळबाई महिला भजन मंडळ दोडामार्ग यांचे सुश्राव्य भजन
दुपारी १.०० ते ३.०० महाप्रसाद
राञी आठ ते दहा पर्यंत महाप्रसाद
दुपारी १ ते ३ दरम्यान
श्री दत्तभजनी संगीत भजनी मंडळ, बच्चे सावर्डे कोल्हापूर यांचे सुश्राव्य भजन दुपारी ३.०० ते ४.३० वा श्री हनुमान दामोदर प्रासादिक भजन मंडळ भेडशी यांचे सुश्राव्य भजन
साडेचार ते साडेसहा दरम्यान
ह.प.भ श्री. भाऊ नाईक वेतोरे यांचे सुश्राव्य कीर्तन सायंकाळी सात वाजता सांज आरती. रात्रौ. ८.०० ते १०.००
श्री. प. पूराऊळ महाराजांचा पादुकांची पालखी मिरवणूक सोहळा ढोलपथकाच्या ढोलवाद्याच्या गजरात
रात्रौ १०.०० वा. श्री. कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर यांचा दशावतारी नाट्यप्रयोग. “देवी भ्रद्राकाली सादर होणार आहे.
तरी सर्व भाविकांनी या उत्सव सोहळ्याचा, धार्मिक, सांस्कृतिक, कार्यक्रमाचा तसेच अखंड महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्याध्यक्ष विठोबा विनायक राऊळ यांनी केले आहे.
यावेळी कोणतीही सुई न टोचता प्रगत तंत्रज्ञानाद्वारे ३ नोव्हेंबरला आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे
यामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर, दशावतार नाट्य प्रयोगसह भरगच्च कार्यक्रम, १० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून होणार आहे तरी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे













