खेडमध्ये ट्रकला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

कळंबणी बसस्थानकाजवळ ट्रकच्या क्लिनर साईडला नायलॉन पट्ट्याने घेतला गळफास
२८ वर्षीय किशोर कुराडेचा मृत्यू

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील कळंबणी बसस्थानकाजवळ एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ५.१९ वाजण्याच्या सुमारास घडली. किशोर रमेश कुराडे (वय २८, रा. कळंबणी, हंबीरवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर कुराडे याच्या नात्यातील एका लहान भावाने ट्रकला नायलॉन पट्ट्याने गळफास घेतल्याचे त्याच्या वडिलांना फोन करून सांगितले. त्यानंतर वडिलांनी ही माहिती दिलेल्या व्यक्तीने घरातून निघून कळंबणी बसस्थानकाजवळ धाव घेतली. यावेळी किशोर रमेश कुराडे हा ट्रकच्या क्लिनर साईडला नायलॉन पट्ट्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तरुणाच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.