रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात सिंधू जनआरोग्य यात्रेचा शुभारंभ…
वेंगुर्ले ; दाजी नाईक
सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रेचा शुभारंभ आज सोमवारी वेंगुर्ले तालुक्यातील रेडी आरोग्य केंद्रातून होत आहे. या यात्रेच्या माध्यमातून रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा देणे आणि आरोग्य विषयक योजनांची माहिती देण्यात येणार आहे. आरोग्य विषय ही चळवळ आता जनचळवळ व्हावी, अशी अपेक्षा आहे. यासाठी उपलब्ध साधनसामग्री, जिल्हा आरोग्य विभाग, एसएसपीएम हॉस्पिटल, गोवा मेडिकल कॉलेज आणि जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा या सर्वांनी एकत्रित या अशा यात्रा असो किंवा आरोग्य शिबिर असो त्या माध्यमातून सेवा दिल्यास रुग्णांना त्याचा फायदा होईल, असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी रेडी येथे बोलताना व्यक्त केला.
रेडी येथील या सिंधू जन आरोग्य यात्रा शुभारंभ कार्यक्रमाला जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, वेंगुर्ले पंचायत समिती सभापती शंकर घारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, वेंगुर्ले प.स. उपसभापती सचिन देसाई, जि. प. सदस्य सुजाता पडवळ, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहा. गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, रेडी सरपंच रामसिंग राणे, भाजप तालुकाध्यक्ष पपू परब, पंचायत समिती सदस्य प्रियांका घाटवळ, नितीन मांजरेकर, आपा फाणसेकर, संकेत धुरी, शिरोडा सरपंच लतिका रेडकर, आरवली सरपंच समीर कांबळी, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, तसेच डॉ प्रसाद साळगावकर, लक्ष्मीकांत कर्पे, मयुरेश शिरोडकर, वसंत तांडेल, तुषार साळगावकर, हितेश धुरी, भूषण आंगचेकर, कौशिक परब, अमित गावडे, शिरोडा ग्राम अधिकारी निगुडकर, रेडी ग्रामविकास अधिकारी बागायतकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरोग्य यात्रेदरम्यान रेडी येथे दाखल झालेल्या आरोग्य रथाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमुख कामत यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
भाजपा नेते माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या ७५ वर्ष पूर्ती निमित्त पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आम्ही जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील रुग्णांना गाव पातळीवर आरोग्य सेवेचा लाभ व्हावा यासाठी सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रा सुरू केली. या यात्रेला सिंधुदुर्गात चांगला प्रतिसाद लाभत आहे. आजपासून वेंगुर्ले तालुक्यात यात्रा दाखल झाली आहे. या योजनेचे स्वरूप आणि रुग्णांना होणारा फायदा लक्षात घेऊन आरोग्यमंत्र्यांनी राज्यात ही योजना सुरू केली याचा मनस्वी आनंद आहे असे यावेळी बोलताना जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी सांगितले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नांदगाव येथे उद्घाटन होऊन या यात्रेला सुरुवात झाली. आता वेंगुर्ले मध्ये ही यात्रा आली आहे. सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रेद्वारे तज्ञ वैद्यकीय अधिकारी, एक्स-रे काढण्याची सोय, आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड, आरोग्य तपासणी, शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांची माहिती या यात्रेद्वारे रुग्णांना व नागरिकांना दिली जात आहे.
जिल्हा शिल्लक चिकित्सक श्रीपाद पाटील यांनी बोलताना आता ही गाव पातळीवर सुरू झालेली योजना राज्य पातळीवर राबविण्यात येत आहे. असे पहिलेच घडत आहे, त्यामुळे या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करत यात्रेला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले. तर आभार तालुका आरोग्य अधिकारी रवींद्र लिलके यांनी मानले.













