देवरुख पंचायत समिती विभागात २६२ पदे रिक्त

सामान्य प्रशासन विभागात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या ३२ पदासह ५८ रिक्त
स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी

देवरूख (प्रतिनिधी):

संगमेश्वर (देवरुख) पंचायत समितीच्या विविध विभागातील सुमारे शेकडो पदे रिक्त असल्याने पंचायत समितीचा कारभार करताना कार्यरतांना अतिरिक्त भार उचलावा लागत आहे. देवरुख पंचायत समितीच्या विविध विभागातील महत्त्वाची सुमारे २६२ पदे रिक्त असल्याने कामांचा निपटारा करताना ब्रेक लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

देवरूख पंचायत समितीमध्ये विविध विभागातील महत्वाची असलेली रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी अशी आग्रही मागणी होत आहे. तसेचा तालुक्याची धुरा सांभाळणारे अधिकारी यांनी देखील आपला वचक कर्मचाऱ्यांवर ठेवून कार्यालयीन वेळेत तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यावर अधिकचा भर द्यावा अशी जोरदार मागणी होत आहे. या महत्वाच्या मागण्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे बनले आहे. देवरुख पंचायत समितीत २६२ कर्मचारी रिक्त असुन सामान्य प्रशासन विभागात तब्बल ५८ पदे रिक्त आहेत. यात कनिष्ठ प्रशासन अधिकारी दोन मंजूर पदांपैकी १ पद रिक्त, कृषी अधिकारी जनरल दोन पैकी एक रिक्त, वरिष्ठ सहाय्यक लेखा १, कनिष्ठ सहाय्यक ११ पैकी ५ रिक्त आहेत. रिक्त झालेल्या मध्ये २ मयत,१ निलंबित आणि दोघांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.

याबरोबरच परिचय ३, परिचर (पशुसंवर्धन) ९ , सहाय्यक पशुधन विकास अधिकारी ३, पशुधन पर्यवेक्षक ३ आणि ग्रामपंचायत अधिकारी ११८ पदांपैकी ३२ अशी ५८ पदांचा समावेश आहे. जि. प. बांधकाम उपविभाग देवरुखमध्ये ९ पदे रिक्त असुन यात शाखा अभियंता ९ पैकी ४ पदे रिक्त, स्थापत्य अभियंता सहायक १, कनिष्ठ आरेखक १, चौकिदार १, परिचर १ यांचा समावेश आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कनिष्ठ अभियंता ३, चालक १, परिचर १ रिक्त आहे. तसेच एकात्मिक बाल विकास योजना मध्ये मुख्यसेविका ११ पैकि ३ रिक्त आहेत. आरोग्य विभागात आरोग्य सेवका ६६ मंजुर पदांपैकी ३३ पदे रिक्त आहेत. आरोग्य सेवक ४, आरोग्य सहाय्यिका १, सहाय्यक १, औषध निर्माण अधिकारी २, परिचर 15 विपर आठ सफाई कामगार सहा अशी आरोग्य विभागात ७० पद रिक्त आहेत. याबरोबरच शिक्षण विभागामध्ये ११६ पदे रिक्त आहे. यात शिक्षण विस्तार अअधिकारी ९ पैकी ४ पदे रिक्त, परिचर ७, केंद्रप्रमुख २, मुख्याध्यापक ३, पदवीधर, उपशिक्षक ९७ अशी ११६ पदे आहेत.