लांजा (प्रतिनिधी) : लांजा तालुक्यातील आसगे-तळेराई-गवळीवाडी-शिंदेवाडी रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला.
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात होती. अखेर आमदार प्रमोद जठार यांच्या माध्यमातून वसंतराव तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाचे भूमिपूजन आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते करण्यात आले. या कामामुळे परिसरातील नागरिकांची वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होणार असून, रस्त्याची दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.
दरम्यान भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष शैलेश खामकर, विराज हरमले तसेच पदाधिकारी प्रभाकर टोले, प्रमोद कुरुप, शेखर सावंत यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home महत्वाच्या बातम्या आसगे-तळेराई-गवळीवाडी-शिंदेवाडी रस्ता कामाचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते भूमिपूजन













