गुहागरच्या महिला शिक्षिका शिक्षक आयडॉल पुरस्कार मौजे तवसाळ तांबडवाडी मधिल श्रीमती माधवी मारुती पाटील यांना जाहीर

गुहागर तवसाळ :

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी तालुका गुहागर मध्ये कार्यरत असलेल्या
श्रीमती- माधवी मारुती पाटील यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यावतीने प्रदान करण्यात येणाऱ्या ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६-२७’ साठी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पडवे केंद्रीय सर्व शाळा सह तवसाळ तांबडवाडी मध्ये तर गुहागर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राबवलेले विविध उपक्रम आणि अध्यापनातील योगदानाची दखल घेत माधवी मारुती पाटील यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा आणि शिक्षण प्रक्रिया अधिक आनंददायी व प्रभावी व्हावी, यासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून केला जातो. याच पार्श्वभूमीवर श्रीमती – माधवी मारुती पाटील यांची झालेली निवड विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी नुकत्याच कार्यरत असताना त्यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाची राज्यस्तरावर दखल घेतली जाणे ही शाळेसाठी अभिमानास्पद बाब आहे. शाळा व्यवस्थापन कमेटी मुख्याध्यापक श्री अंकुर मोहिते सर यांनी अभिनंदन केले.तर शिक्षण प्रेमी श्री सचिन कुळये यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या. तसेच ग्रामस्थ व महिला मंडळ आणि मुंबई युवकांनी अभिनंदनकरत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
या उल्लेखनीय कामगिरी बद्दल शाळेचं नाव ऊंच भरारी घेत असे उद्गार काढले. त्यांच्या या यशामुळे शाळेच्या नावलौकिकात आणखी भर पडली आहे.