महिलांसाठी आनंदाची बातमी! NCMC कार्डची अट ३१ डिसेंबरपर्यंत शिथिल

एसटी महामंडळाच्या महिला सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ; रत्नागिरी विभागाची माहिती

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या महिला सन्मान योजनेच्या लाभासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांसाठी आवश्यक असलेल्या NCMC कार्डच्या अटीमध्ये शिथिलता देण्यात आली असून, ही मुदत ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
७ नोव्हेंबर २०२६ पासून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत NCMC कार्डची अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत महिलांना एसटी महामंडळाच्या महिला सन्मान योजनेचा लाभ घेता येणार आहे.
महिलांनी या योजनेचा लाभ घेताना वैध NCMC कार्ड जवळ बाळगावे, असे आवाहन एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
महिलांना एसटी प्रवासात सवलतीचा लाभ मिळावा, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेमुळे महिला प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.