सिंधुदुर्ग, : आंबोली घाटात नाना पाणी पॉइंटपासून सुमारे २०० मीटर अंतरावर साखळी क्रमांक ३१/९७९ येथे झाड पडल्याने वाहतूक सुमारे एक तास बंद होती. वन विभागाचे कर्मचारी, नागरिक आणि वन विभागाच्या जलद प्रतिसाद पथकाने तत्काळ कार्यवाही करून पडलेले झाड बाजूला केले. त्यामुळे सकाळी ९.४५ वाजता वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
सध्या आंबोली घाटातील वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता श्रीमती वृषाली पाटील यांनी दिली.
०००००













