दापोलीत दुर्दैवी घटना: मुंबईला जातो म्हणून गेलेल्या ४६ वर्षीय इसमाचा गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

crime

दापोली :
दापोली तालुक्यातील साखळोली नवजीवन वाडी येथील ४६ वर्षीय रामचंद्र लक्ष्मण गौरत हे दिनांक ८/११/२०२६ रोजी सकाळी १०:०० वाजताच्या दरम्यान मुंबईला जाण्यासाठी तिकीट काढण्यासाठी दापोलीला जातो असे सांगून घरातून निघून गेले होते, मात्र ते संध्याकाळपर्यंत घरी परतले नाहीत. त्यांचा शोध घेत असताना दिनांक ९/११/२०२६ रोजी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास साखळोली पाचांबा येथे ते एका ऐनाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत लटकताना मिळून आले. त्यानंतर त्यांना उपचाराकरिता ॲम्ब्युलन्सने उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे नेले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासणी करून दिनांक ९/११/२०२६ रोजी दुपारी १:०० वाजता मयत घोषित केले. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे आमृ. क्रमांक ८५/२०२६ ने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.