चिपळूण:
चिपळूण एस.टी. डेपो ते पॉवर हाऊस रोडवर दिनांक ११ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ११:५५ वाजण्याच्या सुमारास एस.टी. बस आणि यामाहा आर-१५ मोटारसायकलमध्ये भीषण अपघात झाला. फिर्यादी विकास तुकाराम जाधव हे आपल्या ताब्यातील एस.टी. बसमध्ये (क्र. एम.एच.१४-बी.टी.२९९९) १० ते १२ प्रवासी घेऊन चिपळूण ते टेरव अशी चालवत जात असताना, संशयित आरोपी नित्यानंद विमल राणा याने आपली यामाहा मोटारसायकल (क्र. एम.एच.०२-जी.सी.१३१३) पॉवर हाऊस नाक्याकडून चिंचनाका बाजारपेठेकडे जाताना भरधाव वेगात, हयगयीने आणि रस्ता सोडून रॉन्ग साईडला आणून एस.टी. बसच्या ड्रायव्हर बाजूच्या हेडलाईटला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, एस.टी. बसमधील ६ प्रवाशांसह मोटारसायकलवरील मागे बसलेला इसम आणि चालक असे मिळून एकूण ८ जण किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.













