कट्टा येथे प्रा. मधू दंडवते स्मृतिदिन विविध उपक्रमानी संपन्न !

मसुरे | झुंजार पेडणेकर :बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा येथे प्रा. मधू दंडवते यांचा २१ वा स्मृतिदिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

प्रारंभी मान्यवरांचे हस्ते प्रा मधु दंडवते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

दीपक भोगटे यांनी प्रा. मधू दंडवते यांच्या जीवनचरित्राची माहिती दिली.

प्रा. दंडवते यांचे संपूर्ण जीवन जनतेसाठी अर्पण केले होते. ५ वेळा ते राजापूर मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले होते. भारताचे रेल्वेमंत्री, अर्थमंत्री व नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष या सर्वोच्च पदावर काम करूनही त्यांनी आपला साधेपणा सोडला नाही. त्यांच्या अर्थमंत्रीदाच्या काळात कोकण रेल्वेचा शुभारंभ झाला. अशक्य वाटणारी कोकण रेल्वे त्यांनी सुरू करून दाखवली. उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला असल्याचे ते म्हणाले.

किशोर शिरोडकर यांनीही त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग कथन केले.

तळगाव हायस्कूलचे माजी शिक्षक पंडित बंडू माने यांनी पालकांना मार्गदर्शन केले. सध्याच्या काळात संवेदना हरवत चालली आहे याबद्दल खंत व्यक्त केली. पालकानी आपल्या मुलाना आपल्या कृतितून संवेदनशील बनवावे. त्यांची प्रत्येक कृती त्यांच्या विकासाठी होती. त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांचे जीवन जवळून बघता आले याचा फार आनंद होतो. त्यांच्याच विचाराने सेवांगण काम करीत आहे.

त्याला सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.

यावेळी मान्यवरांचे हस्ते आकाशकंदील व भेटकार्ड स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तिपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. प्रा. मधू दंडवते सेवानिधीचे १२ विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमास पंडीत माने, बापू तळावडेकर, किशोर शिरोडकर, दी पक भोगटे, दादा वंजारी, साक्षी अमरे, मनोज काळसेकर, बाळकृष्ण गोंधळी, विद्या चिंदरकर, पालक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.