श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान पाथरटचा कलशारोहण व कार्तिकी एकादशी सोहळा १९ नोव्हेंबर पासून

 पाली प्रतिनिधी :
श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान मंदिर पाथरटचा कलशारोहण व वार्षिक कार्तिकी एकादशी व त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव सोहळा १९ ते २४ नोव्हेंबर या सहा दिवसांच्या कालावधीत संपन्न होणार आहे. यामधे विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
त्यामध्ये दि.१९ नोव्हेंबर गुरुवार रोजी दुपारी ३.०० वाजता श्री लक्ष्मी पल्लिनाथ मंदिर पाली येथून बाजारपेठेतून कलशांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. दि.२० नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी ८.०० ते ९.०० पर्यंत श्रींचा अभिषेक,पुजा,सकाळी ९.०० ते २.०० कलश पूजन,होम हवन,धार्मिक विधी,दुपारी २.०० ते ४.०० महाप्रसाद,सायं. ६.०० ते ७.०० स्थानिक भजन,सायं.७.००ते ७.३० – आरती,रात्री ८ ते १० – किर्तन-किर्तनकार ह.भ.प. प्रसन्नराज जोशी,रत्नागिरी,हार्मोनिअम चैतन्य पटवर्धन,तबला उदय गोखले.२१ नोव्हेंबर शनिवार रोजी सकाळी ८.०० ते ९.०० श्रींचा अभिषेक,पुजा,सकाळी ९.०० ते १०.०० कलशारोहण मठाधिपती श्री.ष.ब्र. १०८ महादय्या रवीशंकर शिवाचार्य महाराज,श्री देव रेवणसिद्ध मठ संस्थान रायपाटण,राजापूर यांच्या शुभहस्ते,सकाळी १०.००ते ११.०० धार्मिक विधी,दुपारी १२.०० ते २.०० खिचडी प्रसाद,सायं. ३.०० ते ५.०० महिलांचे हळदीकुंकू,सायं. ७.०० ते ८.०० आरती,रात्री ८.०० ते ९.००स्थानिक भजन,रात्री ९.००ते १०.०० भोवत्या, पालखी प्रदक्षिणा,रात्री १० वाजता गोष्ट वारीची ए वन म्युझिक हाऊस मुंबई निर्मित गोष्ट वारीची ६० कलाकारांच्या संचासह,रात्री १२.०० नंतर तुळशी विवाह सोहळा संपन्न होईल.
२२ नोव्हेंबर रविवार रोजी सकाळी ८.०० ते ९.०० श्रींचा अभिषेक,पुजा,
सायं. ७.०० ते ८.०० आरती,रात्री ८.०० ते ९.०० स्थानिक भजन,रात्री १० वाजता – श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान,पाथरट निर्मित दोन अंकी नाटक जीवन रेखा चा प्रयोग होणार आहे. २३ नोव्हेंबर सोमवार रोजी सकाळी ८.०० ते ९.०० श्रींचा अभिषेक, पुजा,सकाळी १०.०० ते सायं.५.०० पर्यंत मोफत आरोग्य शिबीर नाडी तज्ञ डॉ. योगेश मुकादम,रत्नागिरी,सायं.६.०० ते ७.०० पर्यंत स्थानिक भजन,सायं. ७.००ते ७.३० आरती,सायं. ७.३० ते ९.३० हरिपाठ ओम आदिनाथ ऐक्यवर्धन शिष्य मंडळ,माळवाशी करडेवाडी, ता. संगमेश्वर यांचा,रात्री १०.०० वाजता मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. २४ नोव्हेंबर मंगळवार रोजी सकाळी ८.०० ते ९.०० वाजता श्रींचा अभिषेक,पुजा,सकाळी ९.०० ते ११.०० श्री सत्यनारायण पूजा,आरती
दुपारी १२.०० ते १.३० लोटांगण प्रदक्षिणा,दुपारी १.३० ते ४.०० महाप्रसाद,सायं.६.०० ते ७.०० स्थानिक भजन,सायं.७.०० ते ७.३० पर्यंत आरती,सायं. ७.३० ते ८.३० जंबुकेश्वर भजन मंडळ हातखंबा,डांगेवाडी यांचे भजन,सायं. ८ ३० ते १०.३० लकी ड्रॉ सोडत कार्यक्रम,रात्री १०.३० कलगी तुऱ्याचा जंगी सामना शक्तिवाले शाहिर ऋषिकेश कदम खेड,तुरेवाले शाहीर देवेंद्र झिमण,लांजा,कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होईल.
श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान पाथरट यांच्यातर्फे कलशारोहण व कार्तिकी उत्सव सोहळ्याचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.