श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट  येथे २४ नोव्हेंबरला दीपोत्सव!

मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री श्री १०८ महंत मठाधीश प.पू.सदगुरु श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पेनेतून साकार झालेल्या मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट

येथे २४ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

सकाळी ८ :३० वा. श्री स्वामी समर्थ महाराज मूर्ति आणि स्वामी पादुकांवर जलाभिषेक आणि दुग्धाअभिषेक आणि पूजन, सकाळी १० : ०० वा. श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी ११ :३०वा. नैवेद्य आणि आरती, दुपारी १ :०० वा. महाप्रसाद-अन्नदान,

सायंकाळी ६ :०० वा. सुस्वर भजन, सायंकाळी ६ :१५ वा. त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त दीपोत्सव,

सायंकाळी ७ :०० वा. दैनंदिन आरती होणार आहे. श्री देव महापुरुष प्रासादिक भजन मंडळ त्रिंबक, बगाडवाडी. बुवा कु. रियांश त्रिंबककर याचे भजन होणार आहे.

उपस्थितीचे आवाहन

श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट यानी केले आहे.