गुहागर तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवाला उद्यापासून प्रारंभ

गुहागर प्रतिनिधी :
माय भारत रत्नागिरी आयोजित गुहागर तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव दि. 20 पासून श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर येथील क्रीडा नगरीमध्ये प्रारंभ होत आहे. त्यामध्ये युवकांसाठी कबड्डी स्पर्धा तर युवतींसाठी सांघिक खेळामध्ये रस्सीखेच स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत. वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये मुलांसाठी
जुदो कराटे, स्पर्धा तसेच 200 मीटर धावणे स्पर्धा होणार आहेत. तसेच युवतींसाठी रस्सीखेच व शंभर व दोनशे मीटर धावणे या स्पर्धा आयोजित करण्यात आलेले आहेत. तरी युवकांनी क्रीडा शिक्षक श्री निलेश गोयथळे सर तसेच मार्ग जनता विकास प्रतिष्ठानचे संचालक मनोज पाटील यांचेकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.