पांगारी-गुहागर बसमधील प्रकार
गुहागर प्रतिनिधी:
चिखली मांडवकरवाडी येथील मठाजवळ सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घटना घडली. पांगारी-गुहागर मार्गावर धावणाऱ्या एसटी बसमध्ये अचानक साप शिरल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. एसटी प्रवास सुरू असताना बसमध्ये साप आढळून आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या बसचे चालक सचिन चव्हाण व वाहक अभिजित भिडे यांनी प्रसंगावधान पाहून चालक केबिनमध्ये शिरलेल्या सापाला बाहेर काढून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे घेऊन पुढचा प्रवास सुरु केला. चालक व वाहक यांनी दाखविलेला प्रसंगावधान याबाबत सर्वत्र कौतुक केले जात आहे. रविवार असल्याने या एसटीमध्ये विद्यार्थी नव्हते. मात्र प्रवासी मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना धीर देऊन सापाला बाहेर काढले.
एसटी मध्ये साप आला कुठून व तो प्रवाशांमध्ये गेला असता तर अघटीत घडले असते. चालकाच्या केबिनमधील ४३ नंबर सीटवरती प्रवाशांऐवजी वाहक बसल्याने अनर्थ टळला. अखेर हा साप चालकाजवळील खिडकीतून निघून गेला.












