चाफेड येथे श्री. गांगेश्वर मंदिरात २० नोव्हेंबरला अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

शिरगांव (प्रतिनिधी) :

. देवगड तालुक्यातील चाफेड येथील श्री देव गांगेश्वर मंदिरात शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर रोजी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या हरिनाम सप्ताहाची घटस्थापना सकाळी १० वाजता होणार असून, सकाळी ११ वाजता महारती होईल. सायंकाळी ६ वाजता गावदिंडी, तर रात्री ९ वाजल्यानंतर वारकरी दिंडी भजनांचा कार्यक्रम होणार आहे.

 

या धार्मिक सोहळ्याला सर्व भजन मंडळांनी उपस्थित राहून पांडुरंगाच्या दर्शनाचा व हरिनामाचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री गांगेश्वर रासाई देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ चाफेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.