उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी घेतले श्री देवी करंजेश्वरीचे दर्शन

चिपळूण (प्रतिनिधी) : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना.चंद्रकांत पाटील चिपळुणात आले असता त्यांनी येथील श्री देवी करंजेश्वरीचे दर्शन घेतले. यावेळी भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा दक्षिणच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ना.चंद्रकांत पाटील यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी जिल्हाउपाध्यक्ष बळीराम मोरे, जिल्हा सरचिटणीस योगेश शिर्के, सुप्रिया उतेकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष लियाकत शहा, उपनगराध्ययक्षा रुपाली दांडेकर, जिल्हा चिटणीस ॲड.नयना पवार, शहराध्यक्ष आशिष खातू, महिला मोर्चा शहराध्यक्ष रूही खेडेकर, नगरसेवक संदीप भिसे, नगरसेविका अंजली कदम, वैशाली निमकर,शीतल रानडे, रसिका देवळेकर, इम्तियाज कडू, नरेंद्र बेलवलकर, विलास चव्हाण,स्वानंद रानडे, निखिल किल्लेकर, महेश दीक्षित, अनुसूचित जमात मोर्चा जिल्हा सरचिटणीस रवींद्र तटकरे, स्वाती देवळेकर, मंदार ओक यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.