लांजा ( प्रतिनिधी) : तालुक्यातील वेरवली खुर्द ग्रामपंचायतचे सरपंच सुनील बाळकृष्ण खुलम यांना वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ, वेरवली बुद्रुक यांच्या वतीने देण्यात येणारा स्व. रमेश धोंडू डोळस तालुकास्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे.
सामाजिक कार्याची विशेष आवड असलेल्या सरपंच सुनील खुलम यांनी सरपंचपदाच्या कारकिर्दीत श्री. खुलम यांनी ग्रामीण भागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा, गावातील विकासकामे आणि लोकहिताच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान देताना सर्वच स्पर्धा परीक्षा यामध्ये नवोदय बीडीएस, मंथन, स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षाना लागणारे सर्व साहित्य प्रश्नसंच , प्रत्येक वर्षी देऊन प्रत्येक महिन्यात सराव परीक्षा राबवून घेतल्या जातात . मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर लक्ष , कला क्रीडा आणि सांस्कृतिक बाबीवर लक्ष दिले जाते.
सरपंच सुनील खुलम यांनी बचत गटांसाठी स्वतंत्र कार्यालय उभे करून महिला सक्षमीकरण करण्यावर भर दिला आहे. प्रत्येक वाडीवर रस्ते दिले. पाण्याचे प्रश्न मार्गी लावले. वेगवेगळ्या योजनांमधून सर्व घटकांसाठी विकास कामे पूर्णत्वास नेली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
दिनांक २७ डिसेंबर रोजी या सकाळी ९.०० वाजता श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुक प्रशालेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमांमध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या पुरस्काराबद्दल सरपंच सुनील खुलम यांच्यावर तालुक्यातील सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Home महत्वाच्या बातम्या वेरवली खुर्द ग्रामपंचायतचे सरपंच सुनील खुलम यांना स्व. रमेश धोंडू डोळस तालुकास्तरीय...












