ज्येष्ठ नागरिकांच्या स्नेहमेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद!

डॉ. प्रसाद देवधर व डॉ. हर्षल सागावकर यांचे ज्येष्ठांना मोलाचे मार्गदर्शन; अंगणवाडी व आशा सेविकांचा सन्मान

स्वप्निल कदम l कुडाळ :       ज्येष्ठ नागरिकांप्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हळदीचे नेरूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक स्नेहमेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी डॉ. प्रसाद देवधर व डॉ. हर्षल सागावकर यांनी आरोग्यविषयक अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केले.

श्री. दिलीप सावंत मित्रमंडळ व कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने तसेच मनोज गायतोंडे यांच्या आर्थिक सहकार्याने आणि अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविकांच्या सहकार्याने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करत त्यांच्या आरोग्याची काळजी, जीवनशैली आणि आरोग्यविषयक विविध विषयांवर डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला सरपंच सौ. दीप्ती दिलीप सावंत, उपसरपंच गणपत परब, तंटामुक्ती अध्यक्ष नंदू परब, समाजसेवक कृष्णा नाईक, स्वप्निल आमणेकर, गजानन निकम, सुधीर गुंजाळ, उदय सावंत, अरुण म्हाडगूत गुरुजी, सागर भिसे सावंत आदी उपस्थित होते. यावेळी सर्व अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविकांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर नाईक यांनी केले. ज्येष्ठ नागरिकांप्रति आदर व्यक्त करणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमासाठी आर्थिक सहकार्य करणारे मनोज गायतोंडे तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आयोजक दिलीप सावंत यांनी आभार मानले.