वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग; पहाटे पालखी सोहळा
माणगाव, प्रतिनिधी : माणगावची ग्रामदेवता श्री देवी यक्षिणीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जत्रोत्सवाच्या दिवशी सकाळी पूर्णवाचन झाल्यानंतर श्री देवी यक्षिणी मंदिरात ओटी भरणे, नवस बोलणे व नवस फेडणे आदी धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. रात्री १ वाजता वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार असून, त्यानंतर पहाटे पालखी सोहळा संपन्न होणार आहे.
या वार्षिक जत्रोत्सवाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री देवी यक्षिणीचे दर्शन व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन गावकरी, मानकरी आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.













