कुवळे परबवाडी येथे पायवाटेच्या कामाचे भूमिपूजन;
संदीप साटम यांची प्रमुख उपस्थिती!
शिरगांव (प्रतिनिधी) :
. डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत देवगड तालुक्यातील कुवळे येथील परबवाडीमध्ये पाच लाख रुपये खर्चाच्या अंतर्गत पायवाट बांधकामाचे भूमिपूजन भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. कुवळे गावचे सरपंच सुभाष कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष नार्वेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजेंद्र शेट्ये, मंगेश लोके, उपसरपंच सुहास राणे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष थोरबोले, रत्नदीप कुवळेकर, उर्मिला परब, बूथ अध्यक्ष अजित घाडी, माजी सरपंच महेंद्र परब, ग्रामस्थ विश्वनाथ परब आदी मान्यवरांसह परबवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर काम पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार मंजूर झाले आहे. या पायवाटेच्या बांधकामामुळे परबवाडीतील ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.
विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. जनतेने पक्षावरील विश्वास अधिक दृढ करावा, असे प्रतिपादन भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी यावेळी केले.
या विकासकामामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, काम मंजूर करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.













