रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी,कौस्तुभ गावडे फाउंडेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, निरवडेचे आयोजन

सावंतवाडी : निरवडे येथील संस्कार भारती इंटरनॅशनल स्कूलमध्ये २६ नोव्हेंबर २०२६ रोजी रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कौस्तुभ गावडे फाउंडेशन आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, निरवडे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
संस्कार भारती इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन डॉ. शेखर जैन यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेच्या प्राचार्या प्रणाली रेडकर, निरवडे सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच श्री. पेडणेकर आणि निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. अपेक्षा कुबल उपस्थित होते.
या उपक्रमासाठी रोट्रॅक्ट क्लबच्या अध्यक्षा रोट्रॅक्टर श्रिया माठकर, सचिव रोट्रॅक्टर पृथ्वीराज चव्हाण, रोट्रॅक्टर कौस्तुभ गावडे आणि रोट्रॅक्टर इशान डोंगरे यांनी पुढाकार घेतला. रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना मदत करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.













