वांझोळे गावात रावे कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण सहभाग मूल्यांकनाचे प्रात्यक्षिक

वांझोळे(ता.संगमेश्वर):शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते- दहिवली मधील ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनी वांझोळे गावात शिवाजी प्राथमिक महाविद्यालय, हनुमानवाडी या ठिकाणी ग्रामीण सहभाग मूल्यांकन या विषयावर प्रात्यक्षिक घेतले.या कार्यक्रमात त्यांनी गावची माहिती सांगण्यासाठी हुबेहूब गावचा नकाशा बनवला.हा नकाशा बनवण्यासाठी त्यांनी दगड गोटे,पुठ्ठे,गवत,रांगोळी , इ. गोष्टींचा वापर केला.तसेच विद्यार्थ्यांनी गावातल्या स्थानिक लोकांची मदत घेतली व गावातल्या विविध गोष्टींची माहिती गावकऱ्यांना दिली.सदर प्रात्यक्षिकामधून विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना गावचे क्षेत्रफळ,गावातील वन भाग,गावातील सुपीक जमीन,गावातील साक्षरतेचे प्रमाण आणि गावात असलेल्या विविध वास्तू इत्यादी गोष्टींची माहिती दिली. या वेळी वांझोळे गावचे तलाठी सौ.एस.ए.कांबळे,उपसरपंच श्री. काशिराम वाजे,माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. लिंगायत सर,सहशिक्षक व नारळ मित्र चेतन नाईक सर, तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. या सर्व कार्यक्रमास गावकऱ्यांनी व शाळेतील मुलांनी चांगला प्रतिसाद दिला.सदर गटामध्ये कृषि दूत ऋषिकेश खाडे ,श्रीपाद मलकापुरकर,आकाश नांदुरकर, , सोहम पांगरे, ओंकार पाटील, दयानंद साखरकर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या उपक्रमासाठी शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील,विभाग प्रमुख प्रा.एच.एस.भागडे,ग्रामीण कृषि कार्यानुभव अधिकारी प्रा. पी. बी. पाटील,प्रा.एन.सी.पाकळे व प्रा.अंबरिष हत्तली यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले आहे.