नाचणे नं.१ शाळेतील विद्यार्थी आज शिक्षकदिनी चक्क शिक्षक बनले.विद्यार्थ्यांनी वर्ग वाटप करून अध्यापनाचा आनंद लुटला. शिक्षकांचा वेश परिधान करून गणित,हिंदी,मराठी, इतिहास,इंग्रजी विषय आवडीने शिकवले.आपल्याच शाळेतील विद्यार्थी शिक्षक झाल्याने मुलंही खुश होती. या उपक्रमाचे मुख्याध्यापक अनुप्रिता आठल्ये, दीपक नागवेकर, शरदिनी मुळ्ये, अश्विनी पाटील, विनोदीनी कडवईकर यांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थी मुख्याध्यापक अथर्व म्हादे उपमुख्याध्यापक शिवतेज धुळप यांनी आभाप्रदर्शन केले.











