राजापूर (वार्ताहर): ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत राजापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील जवाहरचौक पिकअप शेड परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
गांधी जयंतीचे औचित्य साधून देशभरात गांधी जयंतीच्या पुर्वसंस्थेला स्वच्छता अभियान राबविण्यात आले. राजापूर भाजपाच्या वतीनेही शहरात या अभियानाअंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी जवाहरचौकातील पिकअपशेड परिसरात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहिम राबविली.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस रविंद्र नागरेकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव अनिल करगुटकर, भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे, भाजपा जिल्हा चिटणीस सौ. रसिका कुशे, अर्बन बँक संचालक जयंत अभ्यंकर यांसह सौ. रेणुका गुंडये, श्रीमती शितल रहाटे, दिपक मांडवकर, स्वप्नील गोठणकर, अरविंद लांजेकर, नागेश शेटये, सुयोगा जठार आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.












