अजित यशवंतराव यांची राजापूर व लांजा बस आगाराकडे मागणी
प्रतिनिधी l राजापूर : दिवाळी सण काहीच दिवसांवर आला असून याच कालावधीत कार्तिकी एकादशी आहे. एकादशी निमीत्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी कोकणातील भक्तगण आवर्जून जात असतात. त्यामुळे राजापूर व लांजा या दोन्ही तालुक्यातील भक्तगण मोठ्या संख्येने जाणार असून कार्तिकी एकादशी निमित्ताने राजापूर व लांजा एस टी बस अगाराकडून वारकऱ्यांसाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात यावा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस व स्थानिक नेतृत्व असलेले अजित यशवंतराव यांनी राजापूर व लांजा एस टी बस अगाराकडे केली आहे.
राष्ट्रवादी चे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी राजापूर व लांजा एस टी आगाराला नुकतेच निवेदन दिले. दोन्ही तालुक्याच्या एस टी आगाराला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक १८ ते २३ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत कार्तिकी एकादशी आहे. त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी जात असतात. त्यामुळे वारकऱ्यांच्या प्रवासासाठी राजापूर, ते पंढरपूर, पंढरपूर ते राजापूर तर लांजा आगाराने लांजा ते पंढरपूर, पंढरपूर ते लांजा आशा जादा बस फेऱ्या आगारातून उपलब्ध करून देण्यात याव्या. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी लेखी निवेदनाद्वारे राजापूर व लांजा आगाराकडे केली आहे.
दरम्यान अजित यशवंतराव यांनी केलेल्या जादा बसच्या मागणीमुळे वारकऱ्यांसाठी राजापूर, लांजा ते पंढरपूर असा प्रवास सुखकर होणार आहे.











