खेड (प्रतिनिधी) लोटे रोटरी क्लब व रोट्रॅक्ट क्लब तसेच लोटे पोलीस दूरक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने दीपावलीनिमित्त झोपडपट्टीतील कुटुंबियांना फराळाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी जिल्हा विभागीय अध्यक्ष तुषार खताते, सचिव शुभम काते, मनिष वाडकर, प्रणय काते, हर्ष मोरे, समीर आंब्रे, स्वप्निल कांबळे, अभिजीत कळंबटे उपस्थित होते.










