एकदा संघर्ष वैचारिक असतो. हात वारे किंवा शारीरिक संघर्ष नसतो
संतोष राऊळ ( कणकवली)कोणताही राजकीय संघर्ष हा एखाद्या विषयावरून असू शकतो.व्यक्ती संघर्ष त्याला म्हणत नाहीत.राणे – केसरकर असा कोणताही व्यक्ती द्वेष असलेला संघर्ष आम्ही कधी केलेला नाही. एखाद्या विषयावरून, विकास करण्याच्या दृष्टिकोनाने, वेगवेगळे पक्ष असल्याने मतभेद असू शकतात. तो संघर्ष वैचारिक असतो. हात वारे किंवा शारीरिक संघर्ष नसतो. असे केंद्रीय उद्योग मंत्री, भाजपचे नेते नारायण राणे यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.
शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी जाऊन केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी वैचारिक मतभेदा ला संघर्ष म्हणत नसल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक पक्षाची वेगवेगळी भूमिका असते, एखाद्या विषयाकडे विकासाच्या दृष्टीने बघण्याची पद्धत वेगवेगळी असते त्याला संघर्ष म्हणत नाहीत असे ही सांगितले.











