चिपळूण (प्रतिनिधी) : कोलंबो, श्रीलंका येथे झालेल्या इंडियाज इंटरनॅशनल गृव्ह फेस्टिवल (IIGF) मध्ये चिपळूणच्या नृत्य मल्हार कथ्थक अकादमीच्या संस्थापिका व संचालिका नृत्यालंकार सौ. स्कंधा चितळे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
IIGF ही संपूर्ण भारत भरात होणारी आंतरराष्ट्रीय पातळीवरील सगळ्यात मोठी स्पर्धा आहे. यामधे श्रीलंका येथे १६ देशातील विविध शैलीच्या १२५ स्पर्धकांचा सहभाग होता. त्यातून ८५ स्पर्धकांची निवड उपांत्य फेरीसाठी करण्यात आली. त्यातून २० फायनालिस्ट निवडण्यात आले.
या २० स्पर्धकांमधून कथ्थक नृत्य शैलीमध्ये ३०+ वयोगटात सौ. स्कंधा चितळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी सुधा चंद्रन, शेरीफ सर, कुमार शर्मा यांच्याकडून त्यांना सन्मानित करण्यात आले. देवरुखच्या गुरू शिल्पा भिडे-मुंगळे या त्यांच्या गुरू आहेत. तसेच या स्पर्धेकरता त्यांना गुरू तेजस्विनी साठे, पुणे यांचे मार्गदर्शन लाभले.










