डीबीजे महाविद्यालयाच्या रासेयो निवासी शिबिराचे मिरजोळी येथे आयोजन

चिपळूण (प्रतिनिधी) : येथील डीबीजे वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे निवासी शिबिर दिनांक ५ ते ११ डिसेंबर या कालावधीत मिरजोळी येथे होणार आहे. या निवासी शिबिराचा उद्घाटन सोहळा दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी डीबीजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव बापट यांचे हस्ते होणार आहे.

यावेळी न.ए.सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, व्हा चेअरमन ॲड.जीवन रेळेकर, उपप्राचार्य डॉ.एम एस.चांदा, मिरजोळी गावचे उपसरपंच गणेश निवाते, सर्व ग्रामपंचायत सदस्य, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार अनिल कलकुटकी व ग्रामस्थ आदी उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात बुधवार दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजता ‘योगा प्रशिक्षण ‘सौ शालिनी कवड. सायं.५.३०.वा ‘सर्प मानवाचा मित्र’ याविषयावर.प्रा.हरिदास बाबर, गुरूवार दि.७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता ‘अभिनय कार्यशाळा ‘ सायंकाळी ७ वाजता कोकणातील औषधी वनस्पती’प्रा डॉ.ऋचा खवणेकर यांचे ‘न्यूनतमवाद: जगण्याची नवी पद्धत’ या विषयावर व्याख्यान होईल. शुक्रवार दि.८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता श्री.निलेश बापट यांचे ‘पक्षी निरिक्षण’ या विषयावर तर सायंकाळी ७.०० वाजता प्रा. एक.वाय पुनवतकर यांचे ‘ संमोहन कार्यक्रम होईल. बुधवार दि. ९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता डॉ.शुभम कुशे ‘प्रथमोपचार प्रशिक्षण तर सायंकाळी ७ वाजता डॉ.सम्राट माने यांचे ‘एन.एस.एस.एक सामाजिक चळवळ ‘या विषयावर व्याख्यान होईल. शुक्रवार दि. १० डिसेंबर रोजी दुपारी ३वा. सचिन मोहिते यांचे अंधश्रद्धा निर्मूलन याविषयी व्याख्यान होईल. तर संध्याकाळी प्रा.उदय बामणे यांचे ‘दैनंदिन जीवनाचे शास्त्रशुद्ध मूलमंत्र’या विषयावर व्याख्यान होईल.

सदर शिबिराचा सांगता समारंभ सोमवार दि.११ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता प्रशांत यादव अध्यक्ष वाशिष्ठी मिल्क प्रा. लि. व‌ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होईल. या शिबिराचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. यु.डी. सुर्यवंशी, सह कार्यक्रमाधिकारी प्रा सौ..ए.व्हि कांबळी व प्रा. एस. एस. शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना संयोजन समिती, विद्यार्थी प्रतिनिधी कु माहित मुल्ला, कुमार प्रणव साळवी करीत आहे.