रत्नागिरी :विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेचे काटेकोर नियोजन करुन संबंधित यंत्रणांचा आढावा घ्यावा. सर्व यंत्रणांनी जास्तीत जास्त ग्रामपंचायती, लाभार्थी यांच्यापर्यंत पोहचून मोहिमेत अधिक प्रगती करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी दिल्या.*
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी या मोहिमेबाबत आज तालुकानिहाय सविस्तर आढावा घेतला.
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण केले. या बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, तहसीलदार राजाराम म्हात्रे आदी उपस्थित होते. गटविकास अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार हे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.










