‘थँक्यू बाबासाहेब’ उपक्रमातून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयामध्ये इतिहास विभाग व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मनोगत इतिहास विभाग प्रमुख प्रा. मंदार बेटकर यांनी केले.

भारतीय राज्यघटना निर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोलाचे आहे. बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला तसेच बाबासाहेब विशिष्ट जातीचे नसून सर्व भारतीयांचे आहेत हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले त्यानंतर इतिहास विभागामार्फत ‘थँक्यू बाबासाहेब’ हा उपक्रम घेण्यात आला व त्यांना वेगळ्या स्वरूपात आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला विद्याथ्यानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सौरभ यादव, (तृतीय वर्ष कला) याने बाबासाहेब जीवनपट थोडक्यात मांडला

या कार्यक्रमाला महाविद्यालच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील , कला शाखा प्रमुख सहा. सौ. ऋतुजा भोवड व सर्व कला शाखेचे शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिनी बापट हिने केले तर आदित्य पायरे याने आभार मानले.