भाजपा नेते निलेश राणे यांची शिफारस : केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून निधी : भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची माहिती
मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवण भाजप विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी विकास कार्यक्रम अंतर्गत विकासकामांकरीता २ कोटी ३६ लक्ष पेक्षा जास्त निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली.
मालवण कुडाळ तालुक्यातील डोंगरी गावातील अनेक विकासकामांचा यात समावेश आहे. स्थानिक ग्रामस्थ, गावातील आजी, माजी लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार निलेश राणे यांनी अनेक विकास कामांबाबत शासन स्तरावर शिफासर करून पाठपुरावा केला. त्यानुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सुमारे 2 कोटी 36 लाख पेक्षा जास्त निधी मंजूर झाला आहे. रस्ते व अन्य विकासकामे मार्गी लागणार आहेत. याबाबत स्थानिक ग्रामस्थानीही समाधान व्यक्त करत आभार मानले आहेत.












