हेल्प ग्रुप वांयगणी तर्फे शिक्षण विभागाला निवेदनाद्वारे इशारा
वेंगुर्ले : दाजी नाईक
वांयगणी शाळा नंबर दोन या शाळेत गेले पाच महिने एक शिक्षक सात वर्ग सांभाळत आहे. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत आज हेल्प ग्रुप वांयगणी यांनी तालुका शिक्षण विभागाला भेट देऊन निवेदन दिले. यावेळी शिक्षण विभागा तर्फे दोन दिवसात शिक्षक देण्याचे कबूल केले आहे. मात्र दोन दिवसात शिक्षक नाही दिला तर मुलांना घेऊन उपोषणाला बसणार आहोत असा इशाराही यावेळी हेल्प ग्रुपने दिला आहे.
वायंगणीतील मुलांचे शिक्षका अभावी शैक्षणिक नुकसान होत आहे. हे लक्षात घेता आज हेल्प ग्रुप वांयगणी यानी तालुका शिक्षण विभागाला निवेदन देण्यात आले व शिक्षणाधिकाऱ्यां बरोबर चर्चा करून तात्काळ शिक्षक देण्याची मागणी केली. शिक्षणाधिकाऱ्यांनी सद्यस्थितीत कामगिरीवर शिक्षक देण्याचे कबूल केले दोन दिवसातच शिक्षक शाळेत हजर होतील असे सांगितले. हे निवेदन देताना माजी सरपंच व हेल्प ग्रुप वायंगणी चे अध्यक्ष सुमन कामत, हर्षद साळगावकर, प्रवीण राजापूरकर, महेंद्र सातार्डेकर, शेखर तोरस्कर, उल्हास कामत, सुनील नाईक, नारायण पेडणेकर, प्रशांत पेडणेकर आणि शाळा समिती अध्यक्ष प्रकाश राऊत यावेळी उपस्थित होते. दरम्यान शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.












