वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघातर्फे भात खरेदी शुभारंभ

वेंगुर्ले | प्रतिनिधी : वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघातर्फे भात खरेदी शुभारंभ चेअरमन श्री. ज्ञानेश्वर केळजी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. याप्रसंगी संचालक श्री. विजय रेडकर, श्री.यशवंत उर्फ दाजी परब, श्री. वसंत तांडेल, श्री.प्रकाश गडेकर, श्री. समीर कुडाळकर तसेच भात खरेदी विभागाच्या प्रमुख सौ. तळकर मॅडम आणि श्री. हेमंत नाईक उपस्थित होते.

यावर्षी भात खरेदीची आधारभूत किंमत रु. २१.८३ असून रजिस्ट्रेशन स्लॉट प्रमाणे शेतक-यांना मेसेज येईल. या मेसेज ची सौ. तळकर मॅडम यांना फोन करून खात्री करूनच शेतकऱ्यांनी भात आणावयाचे आहे असे आवाहन याप्रसंगी चेअरमन श्री. ज्ञानेश्वर केळजी यांनी केले आहे.