सावर्डे विद्यालयात गणित प्रतिकृती प्रदर्शन उत्साहात

चिपळूण (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये गणितातील संकल्पना स्पष्ट व्हाव्यात, गणित विषयाची आवड निर्माण व्हावी, गणितीय संकल्पना चित्ररूपाने सहज सुलभ व्हाव्यात या उद्देशाने वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गणित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. पाचवी ते सातवी प्राथमिक गट, आठवी ते दहावी माध्यमिक गट व अकरावी उच्च माध्यमिक गट याप्रमाणे हे प्रदर्शन आयोजित केले होते.

यामध्ये विविध कोनाचे प्रकार, वर्गमूळ काढण्याच्या पद्धती, पायथागोरस सूत्र प्रतिकृती,बहुपयोगी आलेख, सोप्या पद्धतीने बेरीज व वजाबाकी करणे,त्रिकोणमिति, भौमितिक रचना, वर्तुळात विविध संकल्पना आदी विषयांचा संबंध घेऊन प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनीही या प्रदर्शनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तिन गटात मिळून एकूण ३५ प्रतिकृतींची मांडणी सादरीकरण या प्रदर्शनात करण्यात आले होते. या दालनांचे उद्घाटन माजी मुख्याध्यापक मधुकर पाटील व उपमुख्याध्यापक विजय काटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्राथमिक गटातून अमेय नांदिवडेकर व श्लोक पुनवत, सिद्धी पवार व मुग्धा पंडित, कस्तुरी शिंदे व आदिती शेडगे यांच्या प्रतिकृतीने अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.

माध्यमिक गटातून सुयश जाधव, राज घडशी, आदित्य गुडेकर व पार्थ भातडे, गौरी उदेग व सफा माद्रे यांच्या प्रतिकृतीने अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला तर उत्तेजनार्थ प्रथम वैष्णवी घाणेकर व मनस्वी एकनाथ खापरे, साईराज निर्मळ व वेदांत तळेकर यांनी मिळवला. उच्च माध्यमिक गटातून यश मोरे व स्वराज शिंदे, प्राची दळवी व अंजली जौरत,सुयश कुंभार व गट यांच्या प्रतिकृतीनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.स्वरुपा बुदर व गट,सुरभी सावर्डेकर व गट व चैत्राली नरळकर व रिया मते यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले.यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उद्योजक प्रशांत निकम, माजी सभापती पूजा निकम, रत्नागिरी जिल्हा महिला पतसंस्था अध्यक्ष युगंधरा निकम,उद्योजक संजय पाकळे, पत्रकार संदीप घाग व ईश्वर लिंबानी उपस्थित होते. या गणित प्रदर्शनासाठी शिवलिंग सुपनेकर, मनोज कुलकर्णी, संचिता कदम, साजिद चिकटे, अनंत डिके, सुधीर कदम, गणेश बागवे, कविता हळदीवे, शामल म्हादे, अविनाश पोतदार, महेश घाग, तृप्ती भुवड यांनी मार्गदर्शन केले.