देवगड तालुक्यातील पहीले महीला सांस्कृतिक ढोल ताशा पथक चालु करण्याच्या उध्देशाने सिंधू संजीवन संघटना देवगड आणि कुणकेश्वर हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक २४/१२/२०२३ रोजी आयोजित महिला ढोल-ताशा अभिमुखता कार्यक्रम लक्षवेधी ठरला
तालुक्यातील सामाजिक संस्कृतीचे प्रतिक म्हणून संस्कृतीचे आत्मसात व जतन होण्यासठी देवगड तालुक्याचे पहीले महीला सांस्कृतिक ढोल ताशा पथक तयार करण्याचा माणस सिंधू संजीवन संघटना देवगड यांच्या मार्फत केला जाणार आहे आणि या महीला ढोल ताशा पथकाचे पहीले वादन शिवरात्री निमित्त श्री देव कुणकेश्वर मंदिर येथे करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमातुन देवगड तालुक्यातील बहुतांश गावातून महीलांनी आपली नावे नोदंनी करुन या पथकाचे सभासद झाले.
दुपारी २.०० वाजता कुणकेश्वर हायस्कूल येथील ग्रामपंचायत हॉल मध्ये या कार्यक्रमास सिंधू संजीवन संघटना देवगड चे अध्यक्ष श्री चंद्रकांत घाडी, ग्रामपंचायत सरपंच श्री महेश ताम्हणकर , श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष श्री संतोष लब्दे , श्री लक्ष्मी नारायण दळवी फौंडेशन चे ट्रस्टी श्री मंगेश दळवी , कुणकेश्वर हायस्कूल मुख्यध्यापक प्रतिनिधी श्री शेख सर, मार्तंड ढोल-ताशा पथक प्रमुख श्री कुंदन भुजबळ, ग्रामपंचायत कुणकेश्वर ग्रामसेवक श्री गुणवंत पाटील , महिला ढोल तशा प्रतिनिधी सौ सोनाली गावकर आदी मान्यवर उपस्थित होते .
तालुक्यातील सर्व गावातुन महिला प्रतिनीधीनी यात सहभागी झाले . यामध्ये मान्यवर व सहभागी सर्व प्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले . याप्रसंगी ढोल ताशा पथक मार्फत ढोल –ताशा बाबत प्राथमिक माहिती, व प्रात्यक्षिक श्री कुंदन भुजबळ यांनी आपल्या इतर वादकां सोबत सोप्या भाषेत माहिती दिली व हायस्कूल विद्यार्थीनी व महिलांच्या प्रत्येक समस्याचे मार्गदर्शन केले. भविष्यात ढोल ताशा पथक हे उंच उभारी घेऊन देवगड तालुक्यात नाविन्य पूर्ण उपक्रमाचे कौतुक प्रत्येक स्तरातून होईल याबाबत उपस्थित मान्यवर यांनी विचार व्यक्त केले. व सिंधू संजीवन संघटना देवगड आणि कुणकेश्वर हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित महिला ढोल-ताशा अभिमुखाता कार्यक्रम करीता उत्सुक व सहभाग घेऊ इच्छिणार्यांनी सिंधू संजीवन संघटना देवगड चे अध्यक्ष श्री चंद्रकांत घाडी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.












