राजीव गांधी क्रिडांगणावर कै. समीर गुरव स्मृर्ती क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

राजापूर (वार्ताहर): शहरातील वरचीपेठ येथील श्री महापुरूष सेवा मंडळाच्या वतीने राजीव गांधी क्रिडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या कै.समिर गुरव स्मृती क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे व उद्योजक प्रशांत पवार यांचे हस्ते करण्यात आले.

श्री महापुरुष सेवा मंडळाचे वतीने दि. २८ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत.
गुरूवारी अॅड. जमिर खलिफे यांच्या स्पर्धेचा शुभारंभ झाला. याप्रसंगी प्रशांत पवार, संजय पवार, गजानन पवार, महादेव गोठणकर, सौ.शितल पटेल, सौ. शुभांगीसोलगावकर, शहबाज पठाण, महेश बाकाळकर, शरद आडविलकर, दिपक पवार, आप्पा डबरे, दिलीप अमरे आदी मान्यवर उपस्थीत होते.
यावेळी निखिल कोठारकर, विकास कोठारकर, बाळा तांबट, प्रमोद मांजरेकर, बाळु रहाटे, संजय मांडवकर तसेच वाडितील नागरिक उपस्थीत होते.

राजीव गांधी क्रिडांगणावर होणारी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चेतन चव्हाण, अवि तांबट, भाऊ तांबट, किरण मांडवकर, प्रसाद अमरे, भाया अमरे, बाळा गाडगिळ, ओम कोठारकर, फिरोज पठाण, शुभम व सौरभ मांजरेकर, दुर्गा आणी बहाद्दुर बोहरा, विराज कातारी, निर्भय कोठारकर, नयन जोशी, ओमकार कोठारकर मेहनत घेत आहेत
या स्पर्धेत तालुक्यातील नामवंत संघानी भाग घेतला आहे. स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला रोख रूपये २५ हजार व चषक, द्वितीय विजेत्या संघाला रोख रूपये १५ हजार व चषक याशिवाय वैयक्तीक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.