राजापूर (वार्ताहर): सुहास लोळगे स्मृती प्रतिष्ठान आंबेवाडी राजापूर यांचे वतीने नुकताच रक्तदान शिबिर कार्यक्रम संपन झाला. या रक्तदान शिबिरामध्ये ३४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिराला माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, नायब तहसीलदार सौ. दिपाली पंडित, सुरेश बाईत गुरुजी, राजापूर तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते, आंबेवाडी ग्रामस्थ विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश लोळगे, सेक्रेटरी शांताराम रावण, नितीन कूशे आदी मान्यवर उपस्थित होते.
या रक्तदान शिबिर यशस्वितेसाठी कै. सुहास लोळगे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बंडबे, सेक्रेटरी अविनाश लोळगे, उपाध्यक्ष महेश बंडबे, भूषण गार्डी, राकेश कातकर, निलेश नवाले, सागर आंबिलकर, सूरज जड्यार, सूरज आंबिल्कर, विशाल बँडबे, शैलेश गार्डी , सुमित बंडबे आदींनी मेहनत घेतली.












