रुण येथे पार पडले लहान मुलांचे आरोग्य शिबिर , १०६ मुलांनी घेतला लाभ

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील रूण ग्रामपंचायत कार्यालय येथे नुकतेच लहान मुलांचे आरोग्य शिबिर पार पडले या शिबीरात १०६ मुलांनी सहभागी होऊन लाभ घेतला.

रूण ग्रामपंचायत आणि लांजातील सोसायटी मेडिकल , सदीच्छा हॉस्पिटल आणि पावस्कर डेंटल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने रूण ग्रामपंचायत कार्यालय येथे १३ वर्षाखालील मुलांसाठी आरोग्य शिबीर मुलांच्या उत्तम प्रतिसादात पार पडले. जवळपास १०६ मुलांनी यात सहभाग घेऊन आपली आरोग्य तपासणी करून घेतली. मुलांची प्राथमिक आरोग्य तपासणी, दात, रक्तगट व शारीरिक तपासणी निःशुल्क करण्यात आली.

या आरोग्य शिबिरासाठी रूण गावचे सरपंच सुहास साखरकर आणि उप सरपंच रमेश जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले. रुण गावातील नागरिकांनी देखील उत्तम सहकार्य दिले. असे आरोग्य शिबिर गाव खेड्यात होणे ही काळाची गरज आहे. मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत जागरूक रहात त्यांना सुदृढ सशक्त बनवले पाहिजे असे प्रतिपादन सरपंच सुहास साखरकर यांनी केले. शिबिरात आलेल्या डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे रूण ग्रामपंचायती कडून आभार मानण्यात आले.