भाजपा सेवा भावी संस्था ( NGO ) आघाडीच्या वेंगुर्ले तालुका संयोजक पदी विजय रेडकर यांची निवड..

वेंगुर्ले l प्रतिनिधी :भाजपा सेवा भावी संस्था (NGO) आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री. भालचंद्र सुभाषचंद्र राऊत यांनी वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावचे सुपुत्र तथा माजी सरपंच आणि एनजीओ च्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर कार्यरत असलेले तसेच भाजपा सुपरवारियर्स, प्रवासी कार्यकर्ते म्हणून कार्यरत असलेले श्री.विजय रेडकर यांची भाजपा सेवा भावी संस्था (NGO) वेंगुर्ला मंडल संयोजक पदी नियुक्ती केली असून सदरचे नियुक्ती पत्र तालुका कार्यालयात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व मुख्यालय प्रभारी श्री. प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले .

यावेळी जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस ,ओबीसी सेलचे शरद मेस्त्री ,सांस्कृतिक आघाडीचे शैलेश जामदार , आसोली सरपंच बाळा जाधव , किसान मोर्चाचे संदिप देसाई , बुथप्रमुख पुंडलिक हळदणकर , राजेश जामदार इत्यादी उपस्थित होते .

यावेळी मनोगत व्यक्त करताना विजय रेडकर म्हणाले कि , सिंधुदुर्ग जिल्हा सेवा संस्था (NGO) भाजपा आघाडी तर्फे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थांना एकत्रित करून त्यांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास ३००० संस्था धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्टर आहेत ब-याच संस्था सहकार कायद्याखाली नोंदणीकृत आहेत. परंतु त्यापैकी काही मोजक्याच संस्था या शासनस्तरावर कार्यरत आहेत. आणि हे प्रमाण अगदी नगण्य आहे.

आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येने संस्था असूनही बाहेरच्या संस्था येवून जिल्ह्यात काम करीत आहेत. त्यामुळे ज्या जुन्या परंतु सुरू असलेल्या संस्था प्रमुखांची क्षमता बांधणी व मार्गदर्शन करुन त्यांना जिल्हा अध्यक्ष मा.श्री.भालचंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या मूळ प्रवाहात आणले जाईल असे सुतोवाच वेंगुर्ला मंडल संयोजक श्री. विजय रेडकर यांनी यावेळी केले.