रथसप्तमी ला पूर्ण होणार
अभिनेते शरद पोंक्षे,अशोक पोंक्षे यांची उपस्थिती
माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन व
अॅड पी आर नामजोशी कनिष्ठ महाविद्यालय तर्फे ५१ हजार सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे.याची संकल्पपूर्ती रथसप्तमीला होणार आहे.यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते श्री शरद पोंक्षे व ज्येष्ठ रंगकर्मी सामाजिक कार्यकर्ते,व आंबव पोंक्षे येथील श्री सूर्यनारायण संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक पोंक्षे उपस्थित राहणार आहेत.हा कार्यक्रम माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आनंद साठे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
रथसप्तमी च्या दिवशी शाळेच्या मैदानावर सामूहिक सूर्यनमस्कार होणार आहेत.व त्यानंतर संकल्पपूर्ती दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी शास्त्रोक्त सूर्यनमस्कार घातले आहेत अशांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.यावेळी मान्यवरांचे विचार विद्यार्थ्यांना ऐकायला मिळणार आहेत. या ५१ हजारांच्या सूर्यनमस्कारांच्या संकल्पपूर्तीत गुरुकुलपूरक उपक्रमातील विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवला आहे.यासाठी गुरुकुल पूरक उपक्रम प्रमुख सचिन साठे यांनी अपार मेहनत घेतली आहे.हा संकल्प १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदांच्या जयंती दिनी,युवा दिनाचे औचित्य साधून करण्यात आला होता.सूर्यनमस्कार सुरु असताना वेळोवेळी सचिन साठे यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कारांचे महत्व पटवून दिले आहे.२ वर्षांपूर्वी शाळेने १ लाख ५१ हजार सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प सोडून,यशस्वी केला होता.यावेळी देखील प्रशालेतील शिक्षक सचिन साठे यांनी मेहनत घेतली होती.
रथसप्तमी च्या दिवशी होणाऱ्या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन संस्था अध्यक्ष आनंद साठे यांनी केले आहे.











