लांजा (प्रतिनिधी ) दि प्राईड इंडिया संचलित व एच. डी. एफ. सी बॅक व्यावसायिक व सामाजिक जबाबदारी निधीतून पुरस्कृत शेती व शेतीतून ग्रामीण विकास अंतर्गत शेतकरी व शेतकरी गटांना शेतीचे मूल्यवर्धन व विक्री व्यवस्था व उद्योजगता या संदर्भातील मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने लक्ष्य कृषी महोत्सवाचे शुक्रवार दि. १५ मार्च रोजी आग्रे हॉल येथे सकाळी १० ते ४ वा. या वेळेत आयोजन
करण्यात आले आहे.
शेत मालाचे मूल्य वाढावे व शेत माल विक्री व्यवस्था उभारावी व त्यातून शेती उद्योग वाढावे यासाठी दि प्राईड इंडिया सातत्याने प्रयत्नशिल आहे. याचा एक भाग म्हणून तालुक्यातील शेतकर्यांना याबाबत थेट मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने एच.डी.एफ.सी. बॅकेच्या शेती व शेती पूरस्कृत ग्रामीण विकास अंतर्गत निधीतून लक्ष्य कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवा मध्ये वैश्विक फुड चे संस्थापक व संचालक विकास दांगड व दि आसरा फाऊंडेशनच्या व्यवस्थापिका अस्मिता तटके हे मान्यवर शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर या महोत्सवाचे उद्घाटन दि. प्राईड इंडिया मानद संचालिका ईशा मेहरा व प्रकल्प संचालक जालिंदर पांगरे व एच डी एफ. सी. बॅंकेचे अधिकार यांच्या हस्ते केले जाणार आहे.
दरम्यान, या महोत्सवाला तहसिलदार प्रमोद कदम, कृषी विकास अधिकारी विकास शेंडे, जिल्हा विकास प्रबंधक नाबार्ड मंगेश कुलकर्णी, गटविकास अधिकारी योगेश कदम, तालुका कृषी अधिकारी सविता मेहेर, मुख्य अधिकारी नगरपंचायत लांजा हर्षला राणे या हे सर्व मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तरी तालुक्यातील शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दि प्राईड इंडिया कडुन करण्यात आले आहे.










