खेड(प्रतिनिधी)
खेड दापोली मार्गावर सुर्वे इंजीनियरिंग समोर गुरुवारी रिक्षा टेम्पो व दुचाकी यांच्यामध्ये अपघात झाला. या अपघातात जीवित हानी टळली मात्र रिक्षाचा चुराडा झाला. घटनास्थळी खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या प्रसंगावधानामूळे अपघातग्रस्तांना तात्काळ उपचार मिळण्यास मदत झाली.
गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास खेड वरून दापोली येथे जाणार्या एका रिक्षाचा सुर्वे इंजिनिअरींग येथे भिषण अपघात झाला. या अपघाता मध्ये २ माहिला, २ लहान मुली, १ पुरूषा सोबत चालक आणि २ महिन्याच्या लहान मुलीचा देखील समावेश होता. खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना स्वतःच्या गाडीतून भरणे येथील रॉयल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. वैभव खेडेकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामूळे जखमींना उपचारासाठी मदत मिळाली.











