श्रीराम मंदिर लांजा येथे पाच दिवसांचे मोफत योग व प्राणायाम शिबिर संपन्न 

गंगाधर सेवा प्रतिष्टान तर्फे ‘आदर्श माता पुरस्कार सुप्रिया सुधाकर कानडे यांना प्रदान 

संतोष कोत्रे l    लांजा :– परमपूज्य स्वामी रामदेव बाबा पतंजलि योगपीठ हरिद्वार यांचे तत्वानुसार, भारत स्वाभिमान न्यास, महिला पतंजली योग समिती, पतंजली किसान समिती, रत्नागिरी यांच्या सहकार्याने गंगाधर सेवा प्रतिष्ठान लांजा व जंगम समाज मंडळ रत्नसिंधु यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम मंदिर लांजा येथे गुरुवार दि २५ एप्रिल ते २९ एप्रिल असे पाच दिवसांचे मोफत योग व प्राणायाम शिबिर अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाले.

 

सदर शिबिर सकाळ व संध्याकाळ असे दोन सत्रात घेण्यात आले. त्यामध्ये दररोज, आंकार प्राणायाम, योगासने सूक्ष्म व्यायाम, योगिक जॉगिंग तस्य शरीरासाठी आवश्यक असणारी विविध आसने यांचा शिबिरात समावेश करण्यात आला होता.दररोज शिबिरातील योगवर्गासाठी रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्हयातील अभ्यासू योगशिक्षक उपस्थित होते. रत्नागिरीतील श्री विद्यानंद जोग, रमाताई जोग (महिला पतंजली राज्य प्रभारी) योगाशिक्षक विश्वास फाटक, निता साने, वैशाली जंगम, महाड व रायगड त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातू‌न योग शिक्षक प्रकाश कोयरेकर, संजय भोसले व सिंधुदूर्गतील भारत स्वाभिमान सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी टी.व्ही.रावराणे (एम.डी. आयुर्वेद) यांनी लांजातील, शिबिराच्या ठिकाणी मोफत रुग्ण तपासणी करून उपचार केले, मार्गदर्शन केले श्री शंकर स्वामी यांनी दिव्य फार्मसीची, औषधे उपलब्ध करुन दिली. शिबिरादरम्यान आदरणीय श्री बापूजी पाडळकर भारत स्वाभिमान राज्य प्रभारी पूणे यांची एक दिवसाची उपास्थती लाभली. बापूजीनी योग शिक्षकांची जिल्हा स्तरीय बैठक घेवून राममंदीर, लांजा येथे चर्चा घडवून आणली. शिबिरातील सकाळचे एक सत्र बापू‌जीने घेतले त्यात योग प्राणायामाचे महत्व आणि प्राणायाम युक्त आसने याबाबतची माहीती सांगितली.

 

योग शिबिराचे उद्घाटन लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांच्या उपस्थितित पार पडले. एकूण पाच दिवसाच्या कार्यक्र‌मासाठी मुख्य अतिथी म्हणून लांजा गावचे मानकरी नाना शेट्ये महाजन कमलाकर गांधी, प्रतिथयश व्यावसायिक भगवान ढेकणे, लांजा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, कुमार बेंडखळे, सुरेश झोरे, पाटीदार समाजाचे अध्यक्ष दिनेश पटेल यांचे सहकार्य लाभले.

 

या कार्यक्रमाच्या सांगता समारंभासाठी न्यू एज्यूकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष जयवंत शेट्ये तसेच लांजाचे पोलिस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते. दरम्यान, कार्यक्रमात गंगाधर सेवा प्रतिष्टान तर्फे सन २०२३ वीरशैव समाज तालुका मर्यादित ‘आदर्श माता पुरस्कार, सुप्रिया सुधाकर कानडे यांना पतंजलि महिला समितिच्या रायगड जिल्हयाच्या अध्यक्षा वैशाली जंगम याचे हस्ते प्रदान करण्यात आला. शुभदा स्वामी यांनी साडी चोळी देवून आदर्श मातेला सन्मानित केले. यावेळी निवडा समितिच्या श्वेता लिंगायत उपस्थित होत्या.

 

योगा शिबिराचा पाच दिवसांचा कार्यक्रम पतंजली योग समिति भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हा प्रभारी मारुती अलकुटे व तालुका किसान प्रभारी तसेच लांजा मठाचे चालक लक्ष्मण स्वामी यांच्या कुशल नेतृत्वामुळे उत्तमरित्या पार पडला. कु.वेदा जंगम हिने चांगले सहकार्य केले.

कार्यक्रमांसाठी पतंजलि योग समितिच्या असंख्य कार्यकर्त्यानी मेहनत घेतल्यामुळेच सदरचा कार्यक्रम सुरळीत पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी गंगाधर सेवा प्रतिष्ठानचे महेश स्वामी यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.