सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटाराचे काम पाडले बंद

नगरसेवक संजय यादव यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन

लांजा (प्रतिनिधी) हॉटेल्स आणि इतर अन्य दुकानांचे सांडपाणी वाहून येणारे लांजा गोंडे सखल रोड येथील गटाराच्या कामाला विरोध करत येथील नागरिकांनी आज भाजपाचे गटनेते आणि नगरसेवक संजय यादव यांच्या नेतृत्वाखाली लांजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांचे दालनात ठिय्या या आंदोलन केले. आणि जोपर्यंत हे गटाराचे काम बंद केले जात नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही असा इशारा दिला त्यानंतर मुख्याधिकारी यांनी नागरिकांची रास्त भूमिका लक्षात घेऊन हे गटार बंद करण्याच्या सूचना ठेकेदारांना दिल्या .

 

 

लांजा नगरपंचायत हद्दीतील लांजा गोंडे सखल रोड लगत गटाराचे काम सुरू आहे. मात्र सदरच्या गटारातून येथील हॉटेल संकेत हॉटेल कोत्रे हाॅटेल व अन्य दुकानांचे सांडपाणी हे वाहून जाणार असल्याने याचा त्रास हा येथील रहिवाशांना होणार होता. या पार्श्वभूमीवर येथील रहिवाशांनी आज नगरसेवक तथा गटनेते संजय यादव यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले आणि मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

 

 

या निवेदनात म्हटले आहे की लांजा गोंडे सखल रोड येथे रस्त्या लगत गटाराचे काम चालू आहे हे गटात हॉटेल संकेत पर्यंत येत असल्याने व त्या गटारांमध्ये संकेत हॉटेल ,कोत्रे हॉटेल व अन्य दुकानांचे सांडपाणी येण्याची शक्यता असल्याने ते पाणी उलट्या दिशेने म्हणजेच भंडारी घर, आशीर्वाद बिल्डिंग, लांजा हेरिटेज बिल्डिंग, लांजा पॅलेस बिल्डिंग वणू घरी इथपर्यंत ते पाणी येण्याची शक्यता असल्याने आम्हा नागरिकांना प्रचंड दुर्गंधीला सामोर जावे लागणार आहे .या घाणीच्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी, रोगराई ,मच्छरांचा उपद्रव वाढण्याची शक्यता आहे. हे पाणी व वणू घराच्या पुढे कुठेही जाण्याचा मार्ग नसल्याने त्याच ठिकाणी या पाण्याचा साठा होऊन रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेष बाब म्हणजे आज पर्यंत हॉटेलचे सांडपाणी हे महामार्गाच्या दिशेने जात आहे. तरी ते वळविण्याचा केविलवाणा प्रयत्न नगरपंचायत प्रशासन, सत्ताधिकारी यांच्याकडून होत आहे. तरी प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

 

 

तसेच जोपर्यंत या गटाचे काम बंद होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा नगरसेवक संजय यादव आणि येथील रहिवाशींनी घेतल्यानंतर मुख्याधिकारी हर्षला राणे यांनी संबंधित ठेकेदाराला फोन करून सदरच्या गटाचे काम बंद करण्याच्या सूचना दिल्या.