राजापूर | प्रतिनिधी : राजापुरात सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळेअणूस्कूरा घाटात दरड कोसळली असून रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे.
कोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा सर्वात जवळचा घाट म्हणून अनुस्कुरा घाटाची ओळख आहे, पावसाच्या सुरुवातीलाच या घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्याने भविष्यात या घाटातील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.












