मळगाव इंग्लिश स्कूल आता सोलार एनर्जी वर

जिल्ह्यातील सोलार प्रकल्प राबविणारी पहिली शाळा

सावंतवाडी । प्रतिनिधी : मळगाव ऐक्य वर्धक संघ, मुंबई संचलित मळगाव इंग्लिश स्कूल मळगावमध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोलार प्रकल्प राबविणारी ही पहिलीच शाळा ठरली आहे.
वाढती वीज समस्या व विजेचे वाढलेले दर व त्यामुळे येणारी भरमसाट बिले या पार्श्वभूमीवर भविष्याच्या दृष्टिकोनातून सोलार प्रकल्पाची गरज लक्षात घेऊन या प्रशालेत हा सोलार प्रकल्प राबविण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी संस्थेचे सचिव आर.आर. राऊळ यांनी पुढाकार घेऊन हे काम पूर्णत्वास नेले. तसेच या कामी स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ व प्रशालेचे संगणक निदेशक रितेश राऊळ यांनीही मदत केली.

 

या सोलार प्रकल्पाचे उद्घाटन प्रशालेची विज्ञान विषयाची आवड असणारी विद्यार्थिनी कु.निधी राऊळ हिच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. देवधर यांनी सोलार एनर्जी बद्दल मार्गदर्शन केले. सोलार कसा चालतो, त्याचा उपयोग काय याबद्दल विशेष माहिती दिली.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती फाले यांनी केले. माजी मुख्याध्यापक दिवाकर राऊळ सर यांनी भविष्याचा दृष्टीने सोलार किती महवाचा आहे हे सांगितले तर मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव माजी विद्यार्थी परिवार संघाचे अध्यक्ष शेखर पाडगावकर यांनी सोलार प्रशालेला किती गरजेची व महत्वाची होती हे सांगून याकामी प्रकल्पासाठी पुढाकार घेणारे आर.आर.राऊळ यांचे आभार मानले.

 

यावेळी संस्था सचिव आर. आर. राऊळ, संस्था सदस्य श् रामचंद्र केळुस्कर, स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, संस्था सल्लागार ॲड. विरेश राऊळ, प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती फाले, स्कूल कमिटी सदस्य गुरुनाथ नार्वेकर, शिक्षण सल्लागार व प्रशालेचे माजी विद्यार्थी दिवाकर राऊळ, माजी विद्यार्थी परिवार अध्यक्ष शेखर पाडगावकर, सचिव महेश गावकर सर माता पालक संघाचे श्रीम. नाटेकर, सदस्य दीपक जोशी, बिबवणे हायस्कूलचे माजी कला शिक्षक विलास मळगावकर, बाबी राऊळ, प्रसाद नाईक, गुरुनाथ गावकर पत्रकार नीलेश परब तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक आदी सर्व उपस्थित होते.